PMPML bus service begins for villages near NDA

Share this News:

एनडीए भागातील गावांच्या समस्या सुटल्या
गावकऱ्यांसाठी पीएमपीएमएल बस सुरु

पुणे, दि. ११ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या पलीकडे असलेले हवेली तालुक्यातील अहिरे हे गाव आणि त्यालगतच्या सहा वाड्यांतील नागरिकांच्या समस्या सुटल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश आले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनीच काल (दि. १० जून) या गावांसाठी एनडीइच्या आवारातून पीएमपीएमएल बस सुरु झाली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी गेली अनेक वर्षे एनडीए प्रशासनासोबत बैठका घेऊन तसेच पत्रे देऊन गावकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली होती. त्याला अपेक्षित यश आले असून गेल्या महिन्यात २३ मी रोजी गावकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक प्रतिनिधी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर धनगर बाबा मंदिरात पुजा करण्यास परवानगी देण्यात आली. त्यावेळी झालेल्या बैठकीत मोकरवाडी येथील बसथांब्याबाबत सकरात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन प्रबोधिनीतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार ही मागणीही पूर्ण झाली असून काल (दि. १० जून) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनीच हा प्रश्न सुटला आहे. या गावांतील नागरिकासाठी बस सुरु झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी शुक्राचार्य वांजळे, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, नगरसेवक सचिन दोडके, सुरेश गुजर, अहिरेगावचे सरपंच युवराज वांजळे, उपसरपंच रोहिणी वांजळे, राहुल वांजळे, अतुल दांगट, सतीश वांजळे आदींच्या उपस्थितीत काल या बसचे उद्घाटन करण्यात आले.

गेल्या महिन्यात २५ एप्रिल रोजी त्यांनी स्थानिक गावकऱ्यांना सोबत घेऊन सुप्रिया सुळे यांनी आंदोलनही केले होते. अहिरे हे गाव आणि चार वाड्या या प्रबोधिनीला लागून पण पलीकडील बाजूस असल्याने येथील नागरिकांना प्रबोधिनीच्या ह्द्दीतूनच यावे-जावे लागते. त्यामुळे सुप्रिया सुळे या प्रबोधीनिशी वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला असून यापुढेही नागरिकांच्या मागण्यासाठी त्या प्रयत्नशील राहणार आहेत. प्रबोधिनी प्रशासनाने मागण्या मान्य केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले असून असेच सहकार्य कायम रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.