वीजमीटर वाटपाची नोंद न  तीन घेणाऱ्याअभियंत्यांचे महावितरणकडून निलंबन

मुंबई, दि. 10 ऑगस्ट 2017 : वीज ग्राहकांना वीजमीटर देतांना त्याची नोंद नठेवणे, कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडितथकबाकीदार ग्राहकांना वीजमीटर देणे अशाविविध अनियमितता करणाऱ्या तीनअभियंत्यांवर महावितरणने निलंबनाची कारवाईकेली आहे.  महावितरणचे अध्यक्ष वव्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमारयांच्या आदेशान्वये मुख्यालयातीलअधिकाऱ्यांमार्फत राज्यात मीटर वाटपाच्यानोंदीबाबत तपासणी करण्यात येत असूनत्याअंतर्गत दोषी असणाऱ्यांवर निलंबनाचीकारवाई करण्यात आली आहे.           महावितरणच्या मीटर वाटपातअनियमितता करण्यात येत असल्याच्यातक्रारींची दखल घेत महावितरणचे अध्यक्ष वव्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनीमुख्यालयातील अधिकाऱ्यांना मीटर वाटपाच्यानोंदीबाबत काही परिमंडलांना प्रत्यक्ष भेटी देऊनत्वरीत तपासणी करण्याचे आदेश दिले होते.त्याप्रमाणे कल्याण, नाशिक, अहमदनगर,औरंगाबाद  व जळगाव येथील मीटर वाटपाच्यानोंदीची तपासणी केली. कंपनीतर्फे विकतघेतलेल्या प्रत्येक मीटरची नोंद हीमहावितरणच्या ईआरपी प्रणालीमध्ये ठेवण्यातयेते. तपासणी करण्यात आलेल्या कल्याणपरिमंडलातील खालापूर उपविभाग व शाखाकार्यालयात कार्यरत उपकार्यकारी अभियंता वसहाय्यक अभियंता यांनी महावितरणच्याईआरपी प्रणालीत नोंद न घेता ग्राहकांनावीजमीटर दिले. ईआरपी प्रणालीत नोंद नघेतल्यामुळे ग्राहकांना वापरलेल्या विजेचे बीलचमिळू शकले नाही. हे त्यांनी जाणीवपूर्वक करूनकंपनीचे आर्थिक नुकसान केले. तसेचकायस्वरुपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदारग्राहकांचे मीटर बदलून दिले. त्यामुळे अशाग्राहकांचा वीजपुरवठा पैसे न भरता सुरळीतझाला व त्यामुळेही कंपनीचे आर्थिक नुकसानझाले. त्यामुळे संबंधित अभियंते चौकशीत दोषीआढळल्याने या अभियंत्यांवर निलंबनाचीकारवाई करण्यात आली आहे.           नाशिक परिमंडलातील चांदवडउपविभागांतर्गत दुगाव शाखा कार्यालयातीलकनिष्ठ अभियंता यांनी ग्राहकांना वीजजोडणीदिली. मात्र त्याची नोंद महावितरणच्या ईआरपीप्रणालीत न केल्याने ग्राहकाचे वीजबिलींग सुरूझाले नाही. तसेच मीटरच्या नोंदी ईआरपीप्रणालीत न केल्यामुळे मीटर वापराविना पडूनराहिले यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलेआहे. अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवले नाही याकारणास्तव मुख्य अभियंत्यांचेही स्पष्टीकरणमुख्यालयाने मागविले आहे.           महावितरणने ग्राहकांना देण्यात येणाऱ्यासेवा ऑनलाईन केल्या असून ग्राहकांना देण्यातयेणाऱ्या प्रत्येक मीटरची नोंद महावितरणच्याईआरपी प्रणालीमध्ये असणे बंधनकारक आहे.श्री. संजीव कुमार यांनी याबाबत कठोरकारवाईचे आदेश मुख्यालयातील तपासणीअधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार कल्याण वनाशिक परिमंडलांत ही कारवाई करण्यातआली. इतर परिमंडलातही दोषींवर अशाचपध्दतीची कारवाई करण्यात येणार आहे.