महावितरण देणार नवीन वीजजोडणीकरिता घरपोच सेवा

ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीनवीजजोडणी हवी आहे अशा इच्छुक ग्राहकांसाठी 'कनेक्शन ऑन कॉल सेवा' महावितरणतर्फे सुरू करण्यातआलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईलक्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे. नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावीतसेच ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीयसंचालक श्री. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात एप्रिल 2017 पासूनविशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचा आतापर्यन्त सुमारे 792 ग्राहकांनी लाभ घेतलाआहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघून या विशेषकक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. नवीन वीजजोडणी हवी असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकाने मुख्यालयातीलमदत कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर त्या कक्षातील कर्मचारी या ग्राहकाची सविस्तर माहिती घेतील.त्यानंतर या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल. त्यानुसार त्या कार्यालयातील कर्मचारीवीजजोडणीसाठी लागणारा फॉर्म घेऊन स्वत: या ग्राहकाच्या घरी जातील व फॉर्म भरून घेतील. यावेळीकर्मचारी ग्राहकाचे सर्व विहित कागदपत्रे घेतील आणि त्याला लवकरात लवकर वीजजोडणी देण्याचाप्रयत्न करतील. नवीन वीजजोडणीसाठी इच्छूक असणाऱ्या ग्राहकाला ओळखपत्र पुरावा म्हणून निवडणूक ओळखपत्र,आधारकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, वाहनपरवाना, फोटोपास (शासन मान्यताप्राप्त छायाचित्रीत ओळखपत्र),खरेदी विक्री कराराचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, शासनाने दिलेले वरिष्ठ नागरिकाचे ओळखपत्रयापैकी एक तसेच पत्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिका, स्थानिक करपावती, सक्षम शासकीय अधिकारीयांचा मंजूर नकाशा, घरमालकाचे ना-हरकत प्रमाणत्र (अर्जदार भाडेकरू असल्यास), शासनाने दिलेलेमालमत्ता कार्ड किंवा 7 x 12 चा उतारा, इत्यादीपैकी एक कागदपत्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावेलागणार आहे. नवीन वीजजोडणीसाठी इच्छूक ग्राहकाने मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे 022-26478989व 022-26478899 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्यावतीनेकरण्यात येत आहे.

विघ्न टाळावे वीज अपघाताचे

विघ्नहर्ता श्रीगणेशाचा सार्वजनिक उत्सव शुक्रवारी (दि. 25 ऑगस्ट) सुरु होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची आयोजनासाठी लगबग सुरु झाली आहे....

कोंढवा, वानवडी, एनआयबीएम परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत

पुणे, दि. 21 : मुसळधार व संततधार पावसामुळे वीज वितरण यंत्रणेत एकामागे एक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने रविवारी (20) पहाटे साडेतीनपासून...