NCP workers protest against price rise by BJP govt

Share this News:

ना तेरी है, ना मेरी है। ये सरकार लुटेरी है।। गॅस दरवाढी विरोधात महिलांचा आक्रोश

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार…..वैशाली काळभोर

पिंपरी (दि. 05 जून 2018) भाजपाने निवडणूकीपुर्वी भाववाढ स्थिर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. सर्व नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करु. शेती मालाला भाव मिळवून देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करु. देशातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी दरवर्षी चार कोटी युवकांना रोजगार देऊ. गरीब व अल्पउत्पन्न गटातील कुटूंबांना मोफत घरे देऊ. महिला सक्षमीकरणासाठी नविन योजना अमलात आणू. नद्यांचे संर्वधन, सुशोभिकरण करुन जलपर्यटनास चालणा देऊ. अशा शेकडो घोषणा केल्या होत्या. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होऊन चार वर्ष उलटून गेली तरी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. तर उलट गोरगरिब नागरिकांना तासनतास बँकेच्या रांगेत उभे करुन खाते काढून घेतले आणि आता डिजिटललायजेशनच्या नावाखाली अनेक प्रकारचे टॅक्स आकारुन गरीबांच्या पैशांवर सरकारने डल्ला मारला आहे. मागील चार वर्षात महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक कमी झाली. त्यामुळे नविन रोजगार तर नाहीच उलट आहे तेच कामगार बेरोजगार झाल्याचे चित्र राज्यात व विशेषता पिंपरी चिंचवड मध्ये दिसत आहे. युपीए सरकारने दिलेल्या घरकुल योजना गुंडाळण्याचे काम भाजपा करीत आहे. नद्यांचे संर्वधन तर दुरच नदी पात्रातील अतिक्रमण देखील भाजप सरकारला काढता आले नाही. अशा निष्क्रिय भाजपा सरकारला जनता आगामी निवडणूकीत घरी बसवेल. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात जनजागृती करुन तीव्र आंदोलन छेडणार आहे. असे वैशाली काळभोर यांनी सांगितले.

राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पिंपरी चिंचवडमध्ये गॅस दरवाढी विरोधात केंद्र व राज्य सरकारचा आंदोलन करुन निषेध केला. यावेळी महिलांनी ‘ना तेरी है, ना मेरी है। ये सरकार लुटेरी है।।’ अशा घोषणा दिल्या. दोन दिवसापुर्वी घरगुती गॅस, सिलेंडरच्या किंमतीत 48 रुपयांची वाढ केली. या दरवाढीमुळे महिला भगिनींना कुटूंबाचा मासिक खर्च चालविणे अवघड झाले आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव शंभरीकडे कुच करीत असताना वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे आणि शेतक-यांच्या संपामुळे भाजीपाल्यासह सर्वच पदार्थाच्या किंमती उच्चांकी पातळीवर आहेत. या गॅस वाढीचा व पेट्रोल, डिझेल वाढीचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी मंगळवारी (दि. 5 जून) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आणि चिंचवड गावातील चापेकर चौकात चुल पेटवून पिठलं, भाकरी करुन निषेध केला.

यावेळी माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेविका संगीता ताम्हाणे, कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, मनीषा गटकळ, संघटिका कवीता खराडे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, लता ओव्हाळ, माजी नगरसेविका शकुंतला भाट, गंगा धेंडे, सुप्रिया पवार, संगीता जाधव, जयश्री पाटील, विद्या दिसले, दिपाली देशमुख, मंगला ढगे, रंजना कसबे, प्रिती मोकाशी, निलीमा कळंब, मंदा पेटकर, मिनल नवले, शिल्पा बिडकर, रुपाली गायकवाड, सविता धुमाळ, रामदास मोरे, नरेंद्र जाधव, दत्ता ओव्हाळ, आंनदा यादव, बाळासाहेब पिल्लेवार आदी उपस्थित होते.