Management training through sports management

Share this News:

जागतिक लौकिक असलेले मॅनेजमेंट गुरू श्री श्रीकांत दातार यांनी लिहिले आहे की व्यवस्थापनात यश साध्य करण्यासाठी प्रत्याक्षिकावर भर देणे गरजेचे आहे.

हेच आत्मसात करून सिंबायोसिस व्यवस्थापन शास्त्र शाखेनी  (SIBM ) प्रात्यक्षिकंवर भर देण्यासाठी सलग आठव्या वर्षी अयोगीत केलेल्या SIBM पुणे प्रीमियर लीग (एसपीएल) च्या व्यवस्थापनाची  जबाबदारी या विद्यार्थांना दिली. एसपीएल चे आयोजन गेल्या सात वर्षापासून केले जात आहे.

व्यवस्थापनाच्या विद्यार्थांनी आयपीएल शैली लिलावात भाग घेतला जेथे त्यांना व्यवस्थापनाचे धडे गिरवायला मिळाले.

टीम खरेदी करणे त्याचे व्यवस्थापन करणे हि सर्व जबाबदारी विद्यार्थांना दिली होती. एक ‘टीम “तयार करण्यासाठी चतुराईने आणि कार्यक्षमतेने उपलब्ध संसाधने वापरण्याची जबाबदारी तसेच मर्यादित संसाधने वापरून संतुलित संघ तयार करण्यासाठी विद्यार्थांनी आपले कौशल्य पाणाला लावले

या स्पर्धेने विद्यार्थांना संघभाव कसा उपयोगी पडतो ह्याची प्रचीती दिली त्याच बरोबर सामूहिकतेचे मूल्य शिकवले. अचानक झालेले बदल किंवा अनपेक्षित घटनांमध्ये परिस्थितीशी कसे जुळवून घ्यावे म्हनजेच “संकटकालीन व्यवस्थापन” शिकायला मिळाले.

ब्रँडिंग संकल्पना देखील स्पर्धेत एक महत्वाची भूमिका बजावते. प्रत्येक सघाला एक ब्रॅंड एम्बेसेडर नेमला त्याने ब्रांड (टीम) दृश्यमानता वाढवण्याची जबाबदारी घेतली. विद्यार्थांनी प्रसिद्धी साठी अनेक प्रयत्न केले, डिजिटल असो वा प्रिंट सगले पर्याय विद्यार्थांनी वापरले आणि आपल्या टीम ला प्रसिद्धी मिळवून दिली.  यातूनही विद्यार्थ्यांना ब्रँडिंग विषयी माहिती आणि त्याचा व्यवस्थापन करण्याची संधी मिळाली.