पूरग्रस्तांना होणार खाकरा पॅकेटचे वाटप

Share this News:

29/8/2019, पुणे :

सांगली जिल्ह्याच्या ९ गावातील पूरग्रस्तांना खाकरा या टिकाऊ आणि पौष्टिक खाद्यपदार्थाच्या पॅकेटचे वाटप २९ आणि ३० ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

पुण्यातील सहयाद्री इंडस्ट्रीज लि. या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम आयोजित केला आहे.कंपनीतर्फे सागर मसुरेकर यांनी ही माहिती दिली.

२९ ऑगस्ट रोजी तासगाव, ब्रहमनाळ, चोपडेवाडी, भिलवडी, अमनापूर, डिग्रज येथे पूरग्रस्तांना खाकरा पाकिटे दिली जाणार आहेत.

३० ऑगस्ट रोजी कुरुंदवाड, दत्तवाडी, टाकळीवाड, टाकळी, राजापूर, खिद्रापूर, येथे या खाद्यपदार्थाची पाकिटे दिली जाणार आहेत. कंपनीचे विपणन विभागाचे सरव्यवस्थापक दत्तात्रय दौंडकर , श्रध्दा घोषाल, उपेंद्र देव , सचिन शिंदे, स्वाती सातपुते हे कंपनीचे अधिकारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, तसेच सांगली जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून हा उपक्रम आखण्यात आला आहे.