CM assures ordinance on Bullock cart race after MLA Landge’s cart ride

Share this News:

बैलगाडा शर्यती संदर्भात अध्यादेश काढणार !!!

 _ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
 _ आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा 

मुंबई –    
     तामिळनाडूतील जलीकट्टूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात या बाबत विधेयक मंजूर करून अध्यादेश काढण्यात येणार आहे. असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

      राज्य विधिमंडळाचे अधिवेशन मुंबई येथे सोमवार पासून सुरु झाले. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गाडामालकांनी विधिमंडळ अधिवेशनात बैलगाडातून धडक दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार लांडगे यांच्या मध्ये बैलगाडा शर्यत संदर्भात न्यायालयीन मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
   
   दरम्यान विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैलजोडीला नमस्कार केला. तसेच आलेल्या बैलगाडामालकांचे स्वागत ही केले, यावेळी पुणे जिल्हाचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख आणि अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर यांच्यासह राज्यातील बैलगाडा संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
    यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, राज्यातील लोकभावनेचा आदर करून तामिळनाडू सरकारने जलीकट्टू स्पर्धेला सकारात्मक निर्णय घेतला. त्याच धर्तीवर आम्ही राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कारण, बैलगाडा हा राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

     आमदार महेश लांडगे म्हणाले कि बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्रातील एक संस्कुती आहे. शर्यतीसाठी शेतकरी बैलांना विशेष प्रशिक्षण देतात. शेतीच्या कामाला शर्यतीचे बैल उपयोगात येत आहेत. शर्यतीचे बैल सांभाळणे आर्थिकदृष्ट्या जोखमीचे असते. बैलगाडा शर्यत बंद झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तसेच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी. अशी राज्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही बैलगाडातून विधिमंडळ अधिवेशनावर धडक दिली आहे.     
 
 भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी…
बैलगाडा शर्यातीवरील बंदी उठविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सकारात्मक भूमिकेत आहे. मात्र, देशातील प्राणीप्रेमी संस्था – संघटनांनी बैलगाडा शर्यतीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे राज्य सरकारला निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. मात्र, तामिळनाडूतील जलीकट्टूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यात येणार आहे, त्यासाठी न्यायालयीन सल्ला घेऊन विध्येयक मंजूर करण्यात येईल. राज्य व केंद्रातील भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,अशी ग्वाही मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

*शेतकरी अस्मिताच महत्वाची*
तांत्रिक दृष्ट्या सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही वाहने विधानभवन परिसरात कायद्याने नेता येत नाही, याच मुद्दाचा आधार घेऊन जेष्ठ पोलीस अधिक्षक यांनी बैलगाडा विधानभवन परिसरात आणण्यास मनाई केली. हि गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजल्यावर ते स्वतः व पालकमंत्री बापट साहेब दोघेही विधानभवनातुन निघून भाजपा कार्यालया समोर थांबलेल्या बैलगाडा जोडीचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले व आमदार महेश लांडगे तसेच बैलगाडा संघटनेचे निवेदन स्विकारले.