Accident victims saved by Pune Firemen

Share this News:


अग्निशमन जवानाच्या मदतीने अपघातग्रस्त इसमाची सुटका

पुणे – वेळ आली होताी पण काळ नव्हता असे बोल आपण नेहमीच एेकतो. परंतू वेळ आली होती पण अग्निशमन दलाचा जवान होता ना… ! आता असे म्हटले तर कदाचित वावगे ठरु नये असे वाटते. कारण जवळपास या महिन्याभरात पुणे अग्निशमन दलाच्या चार वेगवेगळ्या जवानांनी ड्यूटीवर नसताना देखील कर्तव्य बजावत जिवित व वित्तहानी रोखण्याचा प्रयत्न कशोसीने केला असे आज घडलेल्या घटनेवरुन पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.

घटना आज दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारासची होती. खडकवासल्याच्या दिशेने जाताना किरकटवाडी येथे रहदारीच्या रस्त्यावर एका ट्रॅक्टरचा टायर अचानक फुटल्याने तो ट्रॅक्टर रस्त्यावर आडवा झाला. त्याचवेळी तेथून जाणारी एक मारुती व्हॅन त्या ट्रॅक्टरला धडकल्याने मोठा अपघात झाला. त्यावेळी मारुती व्हॅनचा चालक हा त्या गाडीमधे जखमी अवस्थेत पुढे स्टेअरिंगजवळच अडकला गेला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रथम अॅब्यूलंसला पाचारण केले. परंतू जखमी अवस्थेत अडकलेल्या वाहनचालकास वेळेतच बाहेर काढणे जिकरीचे होते.

त्याचवेळी पुणे अग्निशमन दलाचे जवान संतोष भिलार हे ड्यूटीवर नसताना त्या ठिकाणाहून भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मित्रासमवेत जात असताना त्यांनी हि घटना पाहून लगेचच एका कर्तव्यनिष्ठ अग्निशमन जवानाची भूमिका बजावली. त्यांनी ताबडतोब त्यांच्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती कळवून सिंहगड अग्निशमन केंद्रातील फायरगाडी पाठवण्याची व्यवस्था केली. नंतर वाहनचालक कुठल्या स्थितीत अडकला आहे व त्याची हालचाल कितपत आहे याचा अंदाज घेत एका लोखंडी पहारीच्या साह्याने व स्थानिकांच्या मदतीने छातीजवळ अडकलेला स्टेअरिंग रॉड बाजूला करुन ; खाली ब्रेकमधे अडकलेले दोन्ही पाय काढून घेतले. तसेच लगेचच सदर जखमी वाहनचालकास ताबडतोब रिक्षेमधून दवाखान्यात रवाना केले. हि सर्व कामगिरी जवान संतोष भिलारे यांनी दहा मिनिटातच पार पाडली. जखमी इसमाच्या डोक्याला व पायाला मार लागला असून घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

महिन्याभरात अग्निशमन दलाचे जवान महेश निकम, राजीव टिळेकर, बाबू शितकल व संतोष भिलारे यांनी ड्यूटीवर नसताना बजावलेल्या कर्तव्यामुळे अग्निशमन दलात यांच्या कौतुकास्पद कामगिरीची एकच चर्चा आहे.