शिवजयंती निमित्त भाजपा उद्योग आघाडी तर्फे शिवकालीन शस्त्रास्त प्रदर्शन 

Share this News:

भाजपा उद्योग आघाडी तर्फे श्री अजित जगताप (उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक) यांनी कोथरूड येथील शिवाजी पुतळा जवळ शिवकालीन शस्त्रास्त प्रदर्शन आयोजित केले होते. कोथरूडच्या आमदार प्रा. सौ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी भाजपा सरचिटणीस संदीप खर्डेकर, उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, जयंत भावे, मतदारसंघ अध्यक्ष जगन्नाथ कुलकर्णी, सरचिटणीस प्रकाश बालवडकर, अमोल डांगे, कुलदीप सावळेकर, प्रभाग अध्यक्ष त्रिगुण रेणावीकर, रितेश वैद्य, समीर जोरी निलेश अलाटे, अभिजित मुळे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. दिवसभर सुरु असलेल्या ह्या प्रदर्शनाला कोथरुडरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.