नगर रस्ता व पुणे शहराच्या पूर्व भागातील वाहतुकीचा प्रश्न सुटावा या मागणीसाठी आंदोलन

Share this News:
 
      शहराचा पूर्व भाग विशेषतः संपूर्ण नगर रस्ता व लगतचा परिसर दररोज वाहतूक कोंडीने त्रस्त आहे. या प्रश्नावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी वडगाव शेरी विधानसभा नागरिक कृती समिती तर्फे येत्या २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हयात हॉटेल चौक विमाननगर येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी घंटानादही करण्यात येणार असून प्रशासनाचे तसेच राजकीय नेतृत्वाचेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न या आंदोलनातून आम्ही करणार आहोत.
वाहतूक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रामुख्याने खालील गोष्टी होणे आवश्यक आहे :
 
  • खराडी ते शिवणे हा नदीपात्रातला रस्ता त्वरित व्हावा. नदीपात्रातील जमिनी ताब्यात न आल्याने रखडलेले रस्त्याचे कामाबाबत योग्य तो निर्णय घेणे
  • मुंढवा पुलाचे काम गतीने व्हावे
  • खराडी गावाच्या पलीकडे डीपी रोडवर एक पुलाची आवश्यकता आहे तो व्हावा
  • मुख्य रस्त्यावर वाहतूक नियोजन करणेसाठी वाहतूक पोलीस तसेच ट्राफिक वार्डन नेमावेत
  • मुख्य रस्त्यावरील विविध प्रकारचे अतिक्रमणे हटविणे
नगर रस्त्यावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीने सर्व नागरिक परेशान आहेत. या मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता आज रोजी उपलब्ध नाही. येथील वाहतुकीचा ताण कमी करणे गरजेचे आहे व त्यासाठी गेल्या १० वर्षापासून रखडलेला शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा बहुचर्चित शिवणे ते खराडी दरम्यानचा नदीकाठचा २२.५० किलोमीटर लांबीचा प्रस्तावित रस्ता होणे गरजेचे आहे.
बहुतांश ठिकाणी जागा ताब्यात मिळाली नाही या मुख्य कारणास्तव या रस्त्याचे काम रखडलेले आहे. काही ठिकाणी हरित पट्ट्यातील जागेचा प्रश्नही यास कारणीभूत आहे.

      कल्याणी नगर येथे राजन खिवंसरा हे जमीन मालक जमीन देण्यास तयार असूनही टी.डी.आर देण्याचे पत्र अधिकारी देत नाहीत. इतर ठिकाणीही जागा ताब्यात घेण्यास प्रशासन उदासीन आहे. या रस्त्याबाबत सर्वच पातळ्यांवर असलेल्या उदासीनतेचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसत आहे.

      नदीकीनारचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर शहरातील सुमारे ३०% वाहतूक या रस्त्यावरून होऊ शकते असा तज्ञांचा अंदाज आहे. इतर रस्त्यावरील वाहतुकीचा ताणही त्यामुळे कमी होऊ शकतो.

      पुणे महानगरात दरवर्षी २ लाख वाहनांची भर पडत आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण ७५ टक्के आहे. त्याप्रमाणात रस्ते व वाहतूक प्रकल्प विकसित होताना दिसत नाही.

वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत असल्यामुळेच आंदोलन करणे गरजेचे आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी इतर पर्यायी रस्ताच वाहतुकीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे खराडी ते संगमवाडी हा नदीपात्रातून रस्ता पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी तातडीने बैठक लावून योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.

      वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी वडगाव शेरी विधानसभा नागरिक कृती समिती तर्फे येत्या२८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हयात हॉटेल चौक विमाननगर येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी घंटानादही करण्यात येणार आहे.