राम बांगड, पुष्पा तोष्णीवाल यांना महेश गौरव पुरस्कार   

Share this News:

पुणे, 29/8/2019 : समाजातील विविध घटकांमध्ये आपले योगदान देणा-या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी महेश प्रोफेशनल फोरमतर्फे महेश गौरव-२०१९ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा पुरस्कार रक्ताचे नाते ट्रस्टचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम बांगड, पुष्पा तोष्णीवाल यांना देण्यात येणार आहे. कोथरुड येथील एमआयटी च्या स्वामी विवेकानंद सभागृहात शनिवार, दिनांक ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

कै. मुकुंददास लोहिया यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण समारंभाला महेश प्रोफेशनल फोरम पुणेचे सौरभ सोडानी, पंकज झंवर, डॉ.नवनीत मानधनी, गिरीष गिल्डा, निकेत मंत्री, निर्मल तोष्णीवाल, सीए दिनेश मुंदडा, अंशु मुंदडा, निखील खेतावत, निमेश बेहेडे, अभिषेक सोडानी, सचिन धूत, सीए पवन डागा, सीए विमल कर्नानी, सीए माणकचंद बाहेती यांसह संस्थेचे सभासद उपस्थित राहणार आहेत.

सन्मानचिन्ह, शाल, तुळशीचे रोप असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. पुरस्काराचे यंदा ९ वे वर्ष आहे. यापूर्वी जुगल राठी, वसंतकुमार राठी, मधूसुदन झंवर, रामविलास मंत्री, रामकुमार राठी, अशोक नवल यांसह अनेक दिग्गजांना महेश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.