प्रवाशांना पाच मिनीटात रेल्वेची साधारण तिकिटे मिळण्याची सुविधा सुरु

Share this News:

पुणे , जुलै २४, २०१९ : अनारक्षित तिकीट खिडकीतून तिकीटे खरेदी करणार्या प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे विभागाने ऑपरेशन पाच मिनीट मोहीमेची सुरवात केली आहे. या मोहीमे अंतर्गत अनारक्षित तिकीट खिडकी वरुन तिकीटे खरेदी करण्यास लागणारा वेळ कमीत कमी
करण्यासाठी आणि पाच मिनिटांमध्ये ही तिकिटे उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

पुणे विभाग विविध स्टेशनांवर पाच मिनिटांत प्रवाशांना अनारक्षित तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. या साठी सर्व स्टेशनांवर जागरूकता मोहीमांचे आयोजन करण्यात येत आहे. या नविन प्रयत्नां बाबत पुणे स्टेशन सहित शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी,तलेगांव, सातारा, कराड, सांगली, मिरज व कोल्हापूर बुकिंग कार्यालयांच्या आसपास महत्वाच्या ठिकाणी प्रवाशांना माहिती मिळावी म्हणुन एलईडी बोर्ड लावण्यात आले आहेत. प्रवाशांकडुन या संदर्भात मोबाईल क्रमांक 9766353772 वर त्यांचे अभिप्राय (फीडबैक) देखील नोंदवण्याची विनंती केली गेली आहे. ही मोहीम पुणे मंडळ रेल्वे व्यवस्थापक श्री मिलिन्द देऊस्कर यांच्या  मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक श्री सुनील मिश्रा व मंडळ वाणिज्य प्रबंधक श्री सुरेशचंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरु आहे.

पुणे विभाग डिजिटल माध्यमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रवाशांना सतत तिकिटे खरेदी करण्यासाठी स्मार्ट कार्ड्सचा वापर करण्याचे आवाहन करत आहे. मंडळाने आधुनिक तिकीट व्यवस्था लोकप्रिय करण्यासाठी आणि युटीएस एप चा वापर वाढवण्याच्या उद्देशाने विभागातील अनेक स्टेशनांवर प्रचारात्मक मोहीमा चालू केल्या आहेत. रेल्वे प्रशासन मासिक पासधारक आणि दररोज प्रवास करणार्या प्रवाशांना सुध्दा यूटीएस ऐप द्वारे त्यांच्या प्रवासाची तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन करत आहे जेणेकरून त्यांना होणारी गैरसोय टाळता येईल.

गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, ऐपल स्टोअर मध्ये जाऊन utsapp डाउनलोड करुन त्यामधे रजिस्टर करुन याचा वापर केला जाऊ शकतो. या करिता प्रवाशांना आर वॉलेट चा वापर करुन पेमेंट करता येईल. आर-वॉलेट ला युटीएस काउंटर वर जाऊन किंवा आयआरसीटीसी च्या कॉमन पेमेंट गेटवे utsonmobile.indian.rail.gov.in च्या माध्यमातुन रिचार्ज करता येईल. आर-वॉलेट वापरुन खरेदी केलेल्या तिकीटावर 5 टक्के सुट पण देण्यात येत आहे.