49 yr old Fireman passes SSC with first class marks

Share this News:

वयाची पन्नाशी गाठणारा अग्निशमन जवान दहावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

पुणे – शिक्षणाची ओढ माणसाला स्वस्थ ही बसू देत नाही व त्याची स्वप्नपुर्ती झाल्याशिवाय चैन ही पडत नाही हेच खरे. आर्थिक परिस्थिती नसताना शिक्षणापासून वंचित राहणारे व वयाचा आलेख वाढत जाणाऱ्या परंतू जिद्द मनात बाळगून त्याचा शेवट करणारे तोडकेच. याचेच एक उदाहरण म्हणजे यंदा दहावीत वयाच्या ४९ व्या वर्षी धाडसाने चिकाटी बाळगत घवघवीत ६१.२०% मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे अग्निशमन दलाचे जवान केलास तुकाराम शिंदे.

जवान शिंदे हे चव्हाण नगर मधे वास्तव्यास आहेत. त्यांनी सन १९७४ च्या जवळपास हिरे विद्यालय, पर्वती येथे नववीपर्यंत शिक्षण घेऊन घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडली. परंतू, शाळा सोडल्याची खंत त्यांच्या मनात कायमच होती. नंतर अग्निशमन दलाकडे फायरमन या पदावर नोकरी मिळवली. तदनंतर नोकरी, प्रपंचामुळे शिक्षण घेणे जमले नाही. परंतू, अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी मा. प्रशांत रणपिसे यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन दहावीचा अर्ज भरण्यास सांगितले. त्यांनी ही लगेच शिक्षणाची गोडी म्हणून अर्ज भरुन अभ्यास सुरु केला व विषेश म्हणजे नोकरी, प्रपंच व उत्तम आरोग्य सांभाळत त्यांनी दहावीत प्रथम श्रेणी मिळवत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान तसेच मित्रमंडळी आणि कुटूंबिय त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. जवान कैलास शिंदे हे अजून उत्तम पैलवान व रोज न चुकता व्यायाम करणारे जवान म्हणून ही त्यांची विषेश ओळख आहे.

जवान कैलास शिंदे म्हणाले, माझ दहावी उत्तीर्ण होण्याच स्वप्न आज पुर्ण झाल. या आनंदात माझ्या परिवाराचा मोठा हातभार आहे. तसेच माझी आता पुढे बारावी करण्याची व नंतर पदवीपर्यंत शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाच्या यशाचा आनंद किती मोठा असतो याची प्रचिती आज आल्याचे त्यांनी नमूद केले.