Mehrunnisa Dalwai passes away

Share this News:

*मेहरुन्निसा दलवाई यांचे निधन*

शमशुद्दिन तांबोळी

समाज सुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचे आज दि.८ जून ,सकाळी ११.३०वा.पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. त्या ८८ वर्षाच्या होत्या.

२५ मे १९३० रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. 

हमीद दलवाई यांच्याशी त्यांचा १९५६ मध्ये इस्लामिक पद्धतिने विवाह झाला नंतर एका महिण्याच्या अंतरात त्यांनी विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नोदणी विवाह केला.

उर्दू भाषिक दलवाई भाभींनी अल्पावधित मराठी भाषा अवगत केली .त्यांच्या दोन्ही रुबिना व ईला या मुलीनी आंतरधर्मिय विवाह केला.

हमीद दलवाई यांच्या निधना नंतर त्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात अधिक सक्रिय झाल्या. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे  अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले.

शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम रहावा म्हणून संघर्ष केला तसेच १९८६- ८७ मध्ये महाराष्ट्रात तलाक मुक्ति मोर्चा काढला होता.

मेहरुन्निसा दलवाई यांनी हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इंस्टीट्यूट ची स्थापना केली आहे. 

मेहरुन्निसा दलवाई यांचे मी भरुन पावले हे आत्मचरिञ लोकप्रिय झाले .

मेहरुन्निसा दलवाई यांच्या इच्छे नुसार त्यांचे देहदान करण्यात येणार आहे. 

मेहरुन्निसा दलवाई यांचे देह अंत्यदर्शनासाठी  हडपसर येथील साने गुरुजी हॉस्पिटल येथे ठेवण्यात येणार आहे. सायं७ वा.

–