अभाविप च्या उपोषणासमोर MIT चे प्रशासन अखेर झुकले !!

Share this News:

                        साधना राजनकर या MIT मध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थिनीला गेल्या २ वर्षांपासून जात पडताळणी प्रमानपत्र न आल्यामुळे सातत्याने विविध प्रकारे त्रास देण्यात येत होता अनेक वेळा तिच्यावर  खुल्या प्रवर्गातील फी भरण्याचा दबाव आणण्यात येत होता, दुसर्या वर्षाचा प्रवेश घेताना तिच्याकडून २५,००० रुपये घेण्यात आले होते. अनेक वेळा साधनाला चालू पेपर मधून विविध व्यक्तींच्या परवानगी घेण्यासाठी  उठवण्यात येत होते, तिला माघील वर्षी  प्रवेश नाकारण्यात येत होता त्यावेळी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिला प्रवेश देण्यात आला. या वर्षी मा. उच्च न्यायालयाचा आदेश असूनही तिला चौथ्या वर्षात प्रवेश न देवून मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करण्यात येत. तसेच रजिस्ट्रार कडून लायकी नसेल तर शिक्षण घेऊ नका अशा प्रकारे अपशब्ध वापरण्यात आले होते.

                        दिनांक १७ ऑगस्ट २०१६ रोजी साधना राजनकर या विद्यार्थीनीला उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून प्रवेश द्यावा या मागणीसाठी साधना, तिचे आई वडील व अभाविप कार्यकर्ता मोहित गंडोत्रा MIT चे संचालक मंगेश कराड यांच्या कडे गेले असता तिच्या आई वडिलांना अपशब्ध वापरण्यात आले व मोहित गंडोत्रा ला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणी विरोधात अभाविप तर्फे एरंडवना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर दिनांक १८ ऑगस्ट पासून MIT च्या गेट वर आमरण उपोषण करण्यात आले.

                        शेवटी २० ऑगस्ट ला मध्यरात्री १२.३० वाजता, MIT संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ कराड व उपाध्यक्ष राहुल कराड यांनी येवून आंदोलनकर्त्या अभाविप कार्यकर्त्यांची भेट घेवून घडल्या प्रकारची माफी मागितली व अभाविप च्या मागणीनुसार खालील प्रकारे कार्यवाही करण्याची घोषना केली –

१) विद्यार्थी व पालकांशी शी नेहमीच आरेरावी करणारे मंगेश कराड या पुढे विद्यार्थ्यांशी सबंधित विषयात लक्ष देणार नाही विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या प्राचार्य पातळीवरच सोडवल्या जातील.

२) ज्या रजिस्ट्रार ने साधना ला वेळो वेळी त्रास देवून अपमानित केले व ज्या सुरक्षा रक्षकांनी अभाविप कार्यकर्ता मोहित गंडोत्रा ला मारहाण केली या सर्वांची बदली करण्यात येईल.

तसेच मंगेश कराड यांच्या “अभाविप हे आंदोलन प्रसिद्धी साठी करत आहे” या प्रतिक्रियेबद्दल ही  राहुल कराड यांनी माफी मागितले. या कारवाई च्या घोषणेनंतर अभाविप कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले.

                        जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेवून पूर्ण फी भरण्यास संस्था भाग पडतात अशा सर्व संस्थावर कारवाई करण्यात यावी. तसेच कागद पत्रांची पूर्तता केल्यानंतर ६ महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र मिळावे व यात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभाविप तर्फे  पुणे महानगर मंत्री प्रदीप गावडे यांनी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना करण्यात आली.