मा.श्री.धीरज शर्मा यांची भारतीय राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती

Share this News:

पुणे, मार्च २०१६ : पक्ष बळकटीसाठी आणि मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मा. श्री. धीरज शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याआधी मा. श्री. धीरज शर्मा यांनी भारतीय राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद संभाळले आहे. त्याबरोबरच त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पक्षाचे स्टेट सेक्रेटरी हे पद देखील भूषविले आहे.   त्यांच्या या कारकिर्दीचा सन्मान करत, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे  सरचिटणीस मा. तरिक़ अन्वर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भारतीय  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

श्री.धीरज शर्मा यांचे शिक्षण भारती विद्यापिठाच्या विधी महाविद्यालया मधून झाले आहे.