पुण्यात विकृती का सुडबुद्धी ; अवघ्या बारा तासांत ३३ वाहनांना तिलांजली

Share this News:

पुणे : शहरामधे गेल्या बारा तासांत ३३ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्यरात्री कात्रज परिसरात अडीचच्या सूमारास ३ चारचाकी तर १५ दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. हि बातमी कुठे झळकते ना झळकते तर आत्ता भरदुपारी बाराच्या सुमारास सहकारनगर पोलिस चौकीच्या आवारात स्क्रॅपमधील ११ चारचाकी , २ तीनचाकी व २ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

या दोन्ही घटना अवघ्या काही तासांत घडल्याने कोणी अज्ञात व्यक्ती विकृतीने तर हे कृत्य करित नाही ना असे वाटते तर दुसरीकडे कोणी सुडबुद्धीने हि वाहने पेटवून देत तर नाही ना? असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. ज्या पुण्यात शांतता नांदायची त्याच ठिकाणी हे आगीचे नाट्य का रंगतय याचा शोध घेणे व त्याकरिता सीसीटिव्हीच्या फुटेजचा वापर करून त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून सामजिक क्षेत्रातून किंवा पोलिस वा अग्निशमन दलाकडून अशा घटना रोखण्याकरिता काही उपाययोजना करता येतील का? याचा आढावा घेणे जरूरीचे आहे.

गेल्या महिन्यापासून अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे दररोज  वाहनांना आगी लागण्याच्या वर्द्या येण्याचे प्रमाण वाढले आहे. याला समाजातील नागरिकांनीही पुढाकार घेऊन आपापल्या सोसायटीतील, शाळेतील, ऑफिसमधील वा जिथे अत्यावश्यक आहे त्या ठिकाणी आगीपासून बचावाकरिता आपण काय काळजी घ्यायला हवी याचा विचार करून आपला जीव कसा सुरक्षित राहील याची दक्षता घेण अनिवार्य आहे व आग लागल्यास 101 किंवा 02026451707 या अग्निशमन दलाच्या क्रमांकावर त्वरीत संपर्क साधणे गरजेचे आहे.